Today's Metal Rates (per gram) | |
Metal Type | Metal Rate |
Gold 14 ct | Rs. 3656 |
Gold 18 ct | Rs. 4688 |
Gold 22 ct | Rs. 5750 |
Gold 24 ct (995GW) | Rs. 6170 |
Gold 24 ct (995) | Rs. 6220 |
Gold 24 ct (999) | Rs. 6250 |
Silver | Rs. 73.50 |
Silver Bar | Rs. 74.00 |
‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’कडून
हिरकणी चित्रपटासाठी दागिने
पुणे, 7 नोव्हेंबर 2019
मराठमोळे दागिने घडविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पु. ना. गाडगीळ आणि सन्स व चित्रपटसृष्टी यांचे नाते जुने आहे. त्यातच आणखी एक नवा अध्याय हिरकणी या शिवकालीन चित्रपटाच्या रूपाने पुन्हा जोडला आहे. या चित्रपटासाठी लागणारे तत्कालीन शैलीचे दागिने पु. ना. गाडगीळ आणि सन्सने घडविले आहेत. यात विविध रचनांच्या नथ, मंगळसूत्र, कानातले वेल-बुगड्या, पाटल्या, बांगड्या, तोडे, बोरमाळ, कडे, वाकी, अंगठ्या, कंबरपट्टा, शिरपेच आदी मराठमोळे दागिने आहे.
दागिन्यांसंदर्भात पु. ना. गाडगीळ आणि सन्सचे सीएफओ व विक्री प्रमुख आदित्य मोडक म्हणाले, “आम्ही यापूर्वी शिवकालीन चित्रपटांसाठी अनेक दागिने घडविले असले तरीही हिरकणीसाठी आणखी अभ्यास करून दागिने निर्मिती केली आहे. यासाठी प्रत्येक व्यक्तीमत्व लक्षात घेतले. त्यामुळे दागिने हे सोन्याबरोबर चांदीतही घडविले आहेत.”
हिरकणी चित्रपटाचे दागिने पुण्यात सातारा रोड, औंध, हॅपी कॉलनी-कोथरूड, सिंहगड रोड, चिंचवड आणि भोसरी, तसेच अमरावती, बदलापूर, बीड, धुळे, डोंबिवली, जळगाव, नाशिक, नाशिक रोड, नारायणगाव, नंदूरबार, उस्मानाबाद, परभणी, पंढरपूर, फलटण, सातारा, संगमनेर, शिर्डी, शिरूर, सोलापूर, कलबुर्गी (कर्नाटक), मुंबई, वडोदरा (गुजरात) आणि वर्धा येथील दालनांत उपलब्ध आहेत.
WhatsApp us