Initiative for a nutritious diet

पोषण मूल्य आहारासाठी पीएनजी सन्सचा पुढाकार

बदलापुरात गरजूंना दूध वाटपास सुरुवात

तळागाळातील लोकांची विशेषतः नवमाता व लहान मुलांची पोषण मूल्य आहाराची गरज भागविण्यासाठी पु. ना. गाडगीळ आणि सन्सने पुढाकार घेतला आहे. त्याअंतर्गत गरजूंना विनामूल्य दुधाचे वाटप पीएनजी सन्स करीत आहे. त्याचाच भाग म्हणून बदलापूर व आजूबाजूच्या गावांसाठी हा उपक्रम राबविला जात आहे. शुक्रवारी बदलापुरात यातील दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली. या वेळी पीएनजी सन्सचे मुंबई झोनचे प्रमुख वृजेंद्र वाघचौरे, बदलापूरच्या व्यवस्थापक मनाली घरत, राजकीय नेते संभाजी शिंदे, कुळगाव-बदालापूर नगरपालिकेचे सीईओ योगेश गोडसे, मनाली मिल्कचे हनुमंत मोहिते आदी उपस्थित होते. गेल्या काही वर्षांपासून पीएनजी सन्स विविध सामाजिक उपक्रम अर्थात सीएसआर करीत आहे. या संदर्भात पीएनजी सन्सचे संचालक-सीईओ अमित मोडक म्हणाले, ‘दागिने व्यवसाय करीत असताना आपणही समाजाच्या उभारणीसाठी हातभार लावला पाहिजे, ही आमची भावना आहे. त्यामुळेच विविध ठिकाणी विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम आम्ही राबवत आहोत. दूध पोषणान्न असल्याने कोव्हिड महामारीनंत तळागाळातील नवमाता व लहान मुलांसाठी पुणे जिल्हा, सातारा जिल्ह्यातील गावांतून दूध वाटपाचा उपक्रम सुरू केला. बदलपूरजवळील विविध गावांतून एप्रिलपासून दिवसाला शंभर लीटर दूध वाटप सुरू असून, आता नव्या टप्प्यात एकूण तीस दिवस वाटप होणार आहे.’