अमित मोडक
अस्थिरतेत सर्वाधिक वाढत ते सोने अन् अडचणीत (जोखीम कमी करण्यासाठी व चलन क्षमता टिकविण्यासाठी) कामास पडत तेही सोनंच! व याची प्रचिती सगळ्यांना सध्या जागतिक पातळीवर सुरू असलेल्या भूरजाकीय अस्थिरतेमुळे पुन्हा आली आहे. या पूर्वी कोव्हिड १९ च्या पहिल्या लाटेनंतर सोने भावात चांगलीच वाढ झाली होती अन् सोने आजपर्यंतच्या उच्चांकी म्हणजे प्रति १० ग्रॅम ५६ हजार रुपयांच्या पातळीपर्यंत मजल मारली होती. त्या वेळेस जगातील अन्य सर्व गुंतवणूक पर्याय नकारात्मक होते व सार्वभौम सोने चलनक्षमता टिकवण्याबरोबर रिटर्न देत होते. जगात अनलॉकनंतर प्रक्रिया सुरू झाल्यावर सोन्यात उच्चपातळीवर प्रॉफिट बुकिंग झाले. त्यामुळे सोने प्रति १० ग्रॅम ४६ हजार रुपयांच्या पातळीवर आले होते. पण, कोव्हिड १९ च्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हाएकदा अर्थव्यवस्था सुधारण्याची गती मंदावली, महागाईचे आव्हान समोर उभे ठाकले. त्यामुळे सोने ४६ ते ४९ हजार रुपयांदम्यान डिसेंबर २०२० पर्यंत दोलायमान होते.
सोन्याला पसंती
कोव्हिड १९ च्या तिसऱ्या लाटेने जागतिक पातळीवर पुन्हा डोके वर काढले. तसेच, जागतिक पातळीवर भूराजकीय अस्थिरता निर्माण झाली, साखळी पुरवठ्याच्या मर्यादा यांच्यामुळे कच्च्या तेलाचे भाव प्रति पिंप ८० डॉलरपुढे राहू लागले. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने महगाई नियंत्रणात येत नसल्याचे संकेत दिले. त्यामुळे फेब्रुवरीच्या दुसऱ्या आठवड्यापासून गुंतवणूकदार धास्तवण्यास सुरवात झाली होती. याचे पडदसाद जागतिक पातळीवर शेअर बाजार उमटले; तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाचे विनिमय मूल्यावर होताना दिसले. त्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक पर्याय असलेल्या सोन्याकडे वळाले.
तेजी आली
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून युरोपमध्ये युद्धाचे वातावरण निर्माण होऊ लागे होते. याचे कारण रशिया युक्रनेवर आक्रमण करण्याच्या तयारीत असून, युद्ध सराव सुरू असल्याने जगाच्या समोर आले होते. त्यामुळे प्रति पिंप ८६.३१ डॉलर पातळीजवळ असणारे कच्चे तेल १५ फेब्रुवारीला ९५ डॉलरपर्यंत वाढले. सोने प्रति औंस १८०० डॉलरवरून १६ फेब्रुवारी रोजी १८७१ डॉलरवर पोचले. परिणामी भारतात सोने भावात एक ते दीड हजार रुपयांची वाढ झाली होती. पण, युरोपीय देशांनी रशियावर बंधने आणण्यास सुरुवात केली. तसेच, रशियानेही चर्चेवर आमचा भर असल्याचे सांगितले होते. त्यामुळे सोने भावात झालेली वाढ पुन्हा पूर्वपदावर आली. मात्र, युक्रेनने क्षेपणास्त्र डागल्याने पुन्हा युद्धाची स्थिती निर्माण होत असल्याचे जाणविले. त्यामुळे सोने प्रति दहा ग्रॅम ४८,६०० रुपयांवरून वाढून ५०,४०० रुपयांपर्यंत गेला होता. त्यानंतर फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दोने व्यवहार सत्रांत सोने प्रति दहा ग्रॅम ५० ते ५१ हजार रुपयांदरम्यान होते. पण, २३ फेब्रुवारी रोजी भारतीय वेळनुसार सकाळी साडेआठच्या सुमारास रशियाने युक्रेनच्या सैनिकी ठिकाणांवर हल्ला करीत असल्याची घोषणा करून एकप्रकारचे युद्ध सुरू झाल्याचे सांगितले. त्यामुळे जागतिक पातळीवर सर्व बाजारात मोठ्या प्रमाणात पडझड झाली. त्याच वेळेस सार्वभौव, सुरक्षित, शाश्वत व चलनक्षमता असणाऱ्या सोन्यात गुंतवणुकीस प्राधान्य मिळाले. परिणामी सोने व चांदीत मोठी तेजी आली.
प्रॉफिट बुकिंग; पण..
२३ फेब्रुवारीच्या रात्री सोने प्रति औंस १९०५ डॉलरवर होते आणि गुरुवारी ते १९७३ डॉलरवर गेले. तसेच, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरून ७४.६० वरून ७५.७० च्या पातळीवर घसरले. या दोन्हींचा परिणाम सोने भावावर दिसला. सोन्याच्या भावात काही तासांत ३.२५ टक्के वाढ व रुपयांत प्रति १० ग्रॅम दोन हजार रुपयांनी वाढ झाली व भाव ५२,७०० रुपयांच्या पातळीवर पोचले. दरम्यान, युद्धामुळे जागतिक वित्तीय वातावरणात मोठी अस्थिरता आहे. अमेरिका व युरोपीय देशांनी युद्धात सक्रीय सहभाग घेणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे शुक्रवारी सोन्यात प्रॉफिट बुकिंग झाले आहे. पण, परिस्थिती पूर्णतः निवळेली नाही. रशिया – युक्रेन युद्धात निर्णायक तोडगा निघेपर्यंत वित्तीय स्थिती अस्थिर राहणार, हे निश्चित आहे. तसेच, अमेरिकेतील महागाई, कच्च्या तेलाचे भाव व अन्य भू राजकीय स्थिती यांचे सावट राहणार आहे. त्यामुळे जोखीम कमी करण्यासाठी शेअर बाजाराऐवजी सोने गुंतवणुकीसच प्राधान्य राहील, अशीच स्थिती आहे. परिणामी जागतिक परिस्थिती पाहता सोने भावात खालील पातळीच्या दिशने बदल होण्याची शक्यता कमी आहे. अशा वेळी पूर्वी सांगितल्या प्रमाणे सामान्य गुंतवणूकदारांनी आपल्या पोर्टफोलियोत सोने ठेवलेच पाहिजे. कारण दीर्घकाळात शाश्वत परतावा देणारे सोनेच आहे. तसेच, अस्थिरतेत चलनक्षमता टिकवून धरणारेही सोनेच आहे. रशियानेही युक्रेनबाबतचा निर्णय घेतना परकी गंगाजळी स्वरूपातील सोने साठ्याचा आढावा घेऊनच निर्णय घेतल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. म्हणून आपणही सोन्यात गुंतवणूक करीत राहिले पाहिजे.
संकेत तेजीचे
शुक्रवारी सायंकाळी युक्रेन व रशियाचे अध्यक्ष यांच्यात चर्चा होण्याची शक्यता निर्माण झाल्याने सोने प्रति औंस १८९२ डॉलरच्या पातळीपर्यंत घसले. तसेच, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ७५.६० पातळीवरून सुधारून ७५.२५ च्या पातळीवर आले. त्यामुळे दोन्ही गोष्टींचा परिणाम म्हणून सोने भाव भारतीय बाजारात प्रति दहा ग्रॅम ५०,२०० रुपयांर्यंत खाली आला. युद्ध थांबले तरी युद्धामुळे रशियावर लादलेले आर्थिक निर्बंध हे आर्दिक समतोल व गती करता मारक असल्याने चलनांची अस्थिरता व जीडीपी वाढ मर्यादित झाल्याने सोन्याला मागणी वाढू शकते. त्यामुळे युद्ध थांबल्याची बातमी सोन्यामध्ये तातडीने एक खालची पातळी दाखवू शकते. मात्र, दीर्घकालीन विचार करता त्यात पुन्हा तेजी राहण्याची शक्यता जास्त आहे.
(लेखक कमॉडिटी तज्ज्ञ व संचालक-सीईओ, पीएनजी सन्स)
अमित मोडक
अस्थिरतेत सर्वाधिक वाढत ते सोने अन् अडचणीत (जोखीम कमी करण्यासाठी व चलन क्षमता टिकविण्यासाठी) कामास पडत तेही सोनंच! व याची प्रचिती सगळ्यांना सध्या जागतिक पातळीवर सुरू असलेल्या भूरजाकीय अस्थिरतेमुळे पुन्हा आली आहे. या पूर्वी कोव्हिड १९ च्या पहिल्या लाटेनंतर सोने भावात चांगलीच वाढ झाली होती अन् सोने आजपर्यंतच्या उच्चांकी म्हणजे प्रति १० ग्रॅम ५६ हजार रुपयांच्या पातळीपर्यंत मजल मारली होती. त्या वेळेस जगातील अन्य सर्व गुंतवणूक पर्याय नकारात्मक होते व सार्वभौम सोने चलनक्षमता टिकवण्याबरोबर रिटर्न देत होते.
WhatsApp us