श्रावणानिमित्त पीएनजी सन्सचा
मंगळसूत्र महोत्सव सुरू
पुणे, 14 ऑगस्ट 2021
श्रावणापासून भारतात सण-उत्सवास सुरवात होते आणि भारतीय संस्कृतीचे लेणे साजरे करण्याच्या हेतूने पीएनजी सन्स (पु ना गाडगीळ आणि सन्स) या आघाडीच्या ज्वेलरी ब्रँडने मंगळसूत्र महोत्सवाची घोषणा केली आहे. महोत्सवात मंगळसूत्राच्या घडणावळीवर आकर्षक सवलत आहे.
पीएनजी सन्स मंगळसूत्र महोत्सवाबाबत पीएनसी सन्सचे सीएफओ व मार्केटिंग हेड आदित्य मोडक म्हणाले, की श्रावण महिलांसाठी महत्त्वाचा महिना असून, देशात विविध पद्धतीने तो साजरा होत असली तरी त्याचा भाव एकच आहे. त्यामुळे श्रावणाचा आनंद द्विगुणित होण्यासाठी पीएनजी सन्सने काही वर्षांपूर्वी सर्वप्रथम मंगळसूत्र महोत्सव आयोजित करण्यास सुरवात केली आहे आणि मंगळसूत्र महोत्सव हा आता ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये एक ट्रेंड बनला आहे.
पीएनजी सन्स मंगळसूत्र महोत्सवात पारंपरिक, टेम्पल व डिझायनर मंगळसूत्र तसेच, डायमंड पेंडंट मंगळसूत्र उपलब्ध करून दिली आहेत. महोत्सवात मंगळसूत्राच्या घडणावळीवर १०-३० टक्के, तर मंगळसूत्राबरोबर घेतल्या जाणाऱ्या डायमंड मंगळसूत्र पेंडंटच्या मजुरीवर १०० टक्के सवलत आहे. महोत्सव ९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२१ पर्यंत सुरू राहील, असे मोडक यांनी नमूद केले.
पुण्यात सातारा रोड, औंध, हॅपी कॉलनी-कोथरूड, सिंहगड रोड, चिंचवड आणि भोसरी, तसेच अमरावती, बदलापूर, बीड, धुळे, डोंबिवली, जळगाव, नाशिक, नाशिक रोड, नारायणगाव, नंदूरबार, उस्मानाबाद, परभणी,पंढरपूर, फलटण, सातारा, संगमनेर, शिर्डी, शिरूर, सोलापूर, कलबुर्गी (कर्नाटक), मुंबई, वडोदरा (गुजरात) आणि वर्धा येथील दालनांतून महोत्सव सुरू आहे.
WhatsApp us