सोन्यात गुंतवणूक शाश्वात, म्हणून कशी करावी गुंतवणूक
कोव्हिड १९ नंतरच्या काळात सोन्यात गुंतवणूक कशी असली पाहिजे, सोन्याने आतापर्यंत कसा परतावा दिला आहे, सोन्यात आगामी काळात कशी कामगिरी राहील आदी प्रश्नांवर कमॉडिटी तज्ज्ञ व पीएनजी सन्सचे (पु ना गाडगीळ आणि सन्स लि.) संचालक-सीईओ अमित मोडक यांनी मांडलेली मते महाराष्ट्र टाइम्सच्या पुणे आवृत्तीमध्ये पुणे प्लसमध्ये २१ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
सोन्याच्या दरात चढ-उतार का पाहायला मिळत आहे ?
सोन्याच्या दरात सध्या झालेली सुधारणा (करेक्शन) ही जागतिक अर्थव्यवस्था खूप जास्त अनिश्चिततेतून निश्चिततेतकडे जात असल्याने झाली आहे. करोना, लॉकडाउन, लस, मागणीपुरवठा आदीबाबतच्या अनिश्चिततेमुळे ऑगस्ट २०२०मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सोने २०७० अमेरिकी डॉलर प्रति औंस या उच्चांकी पातळीवर पोहोचले होते. आता थोडी स्थिरता येत असल्याने सोन्यातील गुंतवणूक व्यवसायकडे वळत असल्याने सोन्याचे दर कमी होताना दिसत आहेत.