Khayal Yadnya
To give tribute to Bharatratna Pt. Beensen Joshi on his Birth centenary year, Sangeetacharya D. V. Kanebuwa Pratishthan organized a 3 days Hindustani Classical Vocal program called 'Khayal Yadnya' in Pune in February 2021. PNG Sons feels proud that it was associated with this great event. Mr. Ajit Gadgil, Promoter PNG Sons (P N Gadgil & Sons) welcomed Pt. Ajay Pohankar and his team. Union Minister Mr. Nitin Gadkari visited the event.
पं. भीमसेन जोशी हा आपला अजरामर वारसा
खयाल यज्ञ' संगीत महोत्सवाचे पुण्यात आयोजन
पं. भीमसेन जोशी यांचे गायन अजरामर आहे. शास्त्रीय गायन, अभंग अशा अनेक माध्यमातून त्यांनी संगीत सेवा केली. या संगीत यज्ञातून पंडीतजींच्या स्मृती जपून त्यांना आपण अभिवादन केले, ही चांगली गोष्ट आहे. हा 'खयाल यज्ञ 'महोत्सव रसिकांच्या हृदयात कोरला जाईल. पं. भीमसेन जोशी हा आपला सांस्कृतिक वारसा आहे, तो जपला पाहिजे. महोत्सवात सहभागी कलाकारांचे मी अभिनंदन करतो,' असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केले. ‘स्वरभास्कर’ पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगीताचार्य पंडित द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे ‘खयाल यज्ञ’ या संगीत महोत्सवाचे आयोजन पुण्यात कोथरूडमध्ये यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ रोजी करण्यात आले. पीएनजी सन्स अर्थात पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि. गेल्या अनेक वर्षांपासून संगीताचार्य पंडित द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानशी जोडलेले आहेत. अजित गाडगीळ यांनी पंडित अजय पोहनकर व त्यांच्या शिष्यांचे स्वागत केले.